गडचिरोलीत चालतो आयपीएलवर अवैध ऑनलाईन सट्टा – अनेक युवक,विद्यार्थी वर्ग जात आहेत आहारी

 

देसाईगंज तालुका प्रतिनिधी// अंकुश पूरी

गडचिरोली : आयपीएल चा १४ वा हंगाम प्रेकक्षकांच्या अनुपस्थितीत सुरू आहे. मात्र गडचिरोलीत आयपीएल वर अवैध ऑनलाईन सट्टा चालत असल्याच्या चर्चा अनेकांमध्ये सुरू आहे. यात अनेक युवक वर्ग, विद्यार्थी आहारी जात आहे. अनेक युवकांमध्ये आयपीएल सट्टा बद्दल चर्चा सुरू असल्याचे दिसते. सदर सट्टा हा ऑनलाईन व्हाॅट्सॲप व्दारे चालवला जात असल्याचेही चर्चा सट्टा लावणाऱ्यांकडून ऐकायला मिळत आहे. दररोज लाखोंचा सट्टा लावल्या जात आहे यात कोणी जिंकतात तर कोणी हरतात मात्र यामुळे संसार उघडयावर येण्यास वेळ लागणार नाही. यात अनेक युवकवर्ग सुध्दा आहारी जात असून सध्या लाॅकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत त्यामुळे विद्यार्थी घरीच बसून आयपीएलचा आस्वाद घेत आहेत पंरतु काही विद्यार्थी, युवकवर्ग आयपीएलच्या सट्टयाच्या आहारी जात असल्याचे निदर्शनास येत आहे. तरीसुध्दा पोलीसांनी सदर बाबीकडे लक्ष घालुन अवैध सट्टा वर अंकुश लावणे गरजेचे आहे.