कोरोना बाबत जनतेने काळजी घ्यावी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडणे बंद करावे!!

प्रतिनिधी // दीक्षा झाडे

16 एप्रिल २०२१ चामोर्शी

येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात आज आमदार डॉ देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तालुका कोरोणा परिस्थिती आढावा बैठकीत

उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम तहसिलदार जितेंद्र शिकतोडे पोलीस निरीक्षक शेवाळे उपस्थित होते उपस्थितांना आमदार डॉ देवराव होळी यांनी निर्देश दिले व सांगितले संपूर्ण तालुक्यात तत्काळ लासिकरन केंद्र सुरू  करण्यात यावे तसेच प्रत्येक गावात नागरिकांची तपासणी करण्यात यावी तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालय येथे समस्त कर्मचारी वर्ग यांनी लसीकरण करून घ्यावे व तालुक्यातील समस्त शासकीय व निमशासकीय कार्यालये निर्जंतुकीकरण करण्यात यावे यासाठी स्थानिक नगर पंचायत नगर परिषद  ग्रामपंचायत यांनी पुढाकार घ्यावा गडचिरोली जिल्ह्यात कोरोना रुग्णाचे प्रमाण अतिशय झपाट्याने वाढत असून परिस्थिती अत्यंत चिंताजनक होत असल्याने जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशासनाला या लॉकडाऊन काळात सहकार्य करावे व नैतिक जबाबदारी स्वीकारून कोरोणा विषाणू बाबत जागृत राहून मास्क व स्यानिटायझरचा वापर करावा

गडचिरोली जिल्हयात रुग्ण संख्या वाढत चालली असून मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे ही आपल्या जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा असून आपण शासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आव्हान गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवराव जी होळी यांनी गडचिरोली जिल्हा वासियांना केले आहे