लसोत्सव मोहिमेत सहभागी व्हा – संजय गजपुरे स्वत: लस घेउन मोहिमेचा प्रारंभ

 

बल्लारपूर (राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार पारडी- मिंडाळा- बाळापुर क्षेत्राचे जि.प.सदस्य व भाजपा जिल्हा महामंत्री संजय गजपुरे यांनी नवेगाव पांडव प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशिल्ड लस घेतली .

४५ वर्षावरील नागरिकांनी कोविद लसिकरण करुन घेण्यासाठी संजय गजपुरे यांनी सातत्याने जनजागरण सुरु केले आहे. गुढीपाडवा नववर्षाचे औचित्य साधुन त्यांनी आपल्या पत्नी व कुटुंबियासमवेत लसिकरण करीत पहिला डोज घेतला . वैद्यकीय अधिकारी डॅा. प्रियंका मडावी यांनी लसीकरण प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी मिंथुर ग्रा.पं.चे सरपंच नंदकिशोर करकाडे , ग्रा.पं.सदस्या सौ. सुनिता विष्णु गजपुरे , रुग्ण कल्याण समितीचे सदस्य राजेंद्र गजपुरे यांची उपस्थिती होती.

सध्या प्रत्येक लसीकरण केंद्रात ३०० डोज आले असुन , हे संपताच नविन डोज उपलब्ध होणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॅा.विनोद मडावी यांनी दिली आहे. दररोज प्रत्येक केंद्रात १०० नागरिकांचे लसीकरण केल्या जाणार आहे. ४५ वर्षावरील प्रत्येक नागरिकांनी लसीकरण करुन घेण्याचे आवाहन संजय गजपुरे यांनी केले आहे.