आ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते धनादेश वाटप नगर पंचायतीच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना

 

अहेरी तालुका प्रतिनिधी // इरफान शेख

 

अहेरी:- अहेरी नगर पंचायत अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना(शहरी) लाभार्थ्यांना अनुदानचे पहिल्या टप्प्यातील धनादेश आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते वितरित करण्यात आले.

यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम, अहेरी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी अजय साळवे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अंबुबाई कोसरे, शंकर मामीडवार, पतृजी कोसरे, साई सेकुर्तीवार आदी घरकुल आवास योजनेतील लाभार्थ्यांना आमदार धर्मराव बाबा आत्राम व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्या शुभहस्ते धनादेश वाटप करण्यात आले.

याप्रसंगी आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी, अन्न, वस्त्र, निवारा हे प्रत्येकांसाठी मूलभूत हक्क असून निवारा नसणाऱ्या प्रत्येक कुटुंबियांना घरकुल मिळावे यासाठी आपले पूर्वीपासूनचे मिशन असून आता या पुढेही निवारा व घरांपासून कोणीही वंचित राहू नये यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचे आवर्जून सांगितले.

धनादेश वाटपाच्या वेळी नगर पंचायतीचे कनिष्ठ अभियंता अनिकेत भांडेकर, रा.काँ. चे तालुकाध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, सारिका गडपल्लीवार, शैलेश पटवर्धन, सुरेंद्र अलोने, राहुल गर्गम,गोविंदा दुर्गे, राजू मामीडवार आदी उपस्थित होते.