महामानवास अभिवादन भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीचे खरे पुरस्कर्ते – हंसराज अहीर

 

बल्लारपूर( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती निमित्त पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी चंद्रपूर महानगरातील परमपूज्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी डाॅ. बाबासाहेबांच्या महान कार्याचा पुनरूच्चार करीत भारतीय राज्य घटनेच्या माध्यमातून वैश्विक किर्तीची प्रबळ लोकशाही दिली. समता, बंधुत्व व समान न्यायाचे तत्व दिले. समतेच्या या महासागराने समाजातील दिनदुबळ्यांना सन्मानाने जगण्याचा मुलमंत्रा दिला. त्यामुळे या महामानवाचे या देशातील नागरीकांवर फार मोठे ऋण आहेत. त्यांच्या ज्ञान व विचार कणांचा, अंगिकार करून, राष्ट्राच्या, समाजाच्या उत्कर्षासाठी झटतांनाच राष्ट्रहिताच्या कार्यास झोकुन देत कर्तव्य बजावले. तरच या बोधिसत्वास खरी आदरांजली ठरेल.

यावेळी राजेंद्र गांधी, राहुल घोटेकर, विनोद शेरकी, मनपाच्या महिला बालविकास सभापती शीतल गुरणुले, नगरसेविका सविता कांबळे, वंदनाताई जांभुळकर, खुशबुताई चैधरी, धम्मप्रकाश भस्मे, पुनम तिवारी, स्वप्नील मुन, स्वप्नील कांबळे, राहुल बोरकर, निलेश हिवराळे, व अन्य भाजप पदाधिकारी यांचेसह अनेकांची उपस्थिती होती.