शिवभोजन थाळी भागविणार गडचिरोली जिल्हा वासीयांच्या पोटाची भूक

देसाईगंज तालुका प्रतिनिधी // अंकुश पूरी

 गडचिरोली : कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी राज्य सरकारने लागू केलेल्या संचारबंदीमुळे पुन्हा एकदा हातावर आणून पानावर खाणाऱ्यांपुढे प्रश्नचिन्ह उभे ठोकले आहे. अत्यावश्यक सेवा आणि दुकाने वगळता इतर व्यवहार बंद राहणार असल्यामुळे त्यांची उपासमार होउ नये म्हणून राज्य शासनाने त्यांना शिवभोजन थाळी मोफत देण्याचे ठरविले. मात्र बुधवारी याबाबतचा आदेश शिवभोजन केंद्रापर्यंत पोहोचला नाही. परंतू आदेश मिळताच त्यांची अंमलबजावणी करणार असल्याचे संबंधितांनी सांगितले. गडचिरोली जिल्ह्यात 12 तालूक्यांसाठी 12 शिवभोजन केंद्र सुरू आहेत. आतापर्यंत त्या ठिकाणी आधी 10 आणि नंतर 5 रूपयात जेवणाची सोय केली होती. मात्र, पूर्ण लाॅकडाउनमध्ये 15 ते 30 एप्रिल यादरम्यान सर्वच थाळया मोफत दिल्या जाणार आहेत. गोरगरीब नागरीकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

जिल्हयात कोरोनाचा उद्रेक वाढल्यानंतर लागू केलेल्या अंशतः लाॅकडाउनपासून सर्व शिवभोजन केंद्रावर पार्सल सुविधा सुरू करण्यात आली आहे. दुपारी 12 ते 3 या वेळेत हे केंद्र सुरू असते. या केंद्रावरील शिवभोजनाच्या मर्यादित थाळयांची संख्याा आता वाढवावी लागणारे आहे. ……….