बल्लारपूर येथे विविध ठिकाणी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

 

बल्लारपूर ( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

बल्लारपूर येथे विविध ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

बसती विभाग डाॅ. आंबेडकर भवन, नगर परिषद चौक, टेकडी विभाग येथील पुतळ्यांना माल्यारपन करून अभिवादन करण्यात आले.

जयभीम चौक, मिलींद चौक, सिद्धार्थ मंडळ, शिवाजी वार्ड, पंचशिल चौक, संविधान चौक, वैशाली चौक, जनता हायस्कूल ( डेपो शाखा ), वैभव कांनवेट, साईबाबा ज्ञानपीठ कानवेट, विद्याश्री कानवेट, बल्लारपूर येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनीक वाचनालय, सिद्धार्थ वार्ड, बल्लारपूर तर्फे मसाला भात चे वितरण करण्यात आले. तसेच विविध कार्यालयात मधे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. गटशिक्षणाधिकारी कार्यालयातर्फे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमीत्ताने वर्ग 5 ते 12 साठी विविध उपक्रमांचे आॅनलाईन आयोजन करुन ते #drambedkar2021 वर अपलोड व प्रसार माध्यमांनी प्रसारीत करण्यास सांगितले गेले.