गडचिरोली जिल्हयात आठ मृत्यूसह आज 305 नवीन कोरोना बाधित

    गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी // शुभम खरवडे

गडचिरोली दि.14 आज जिल्हयात 305 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 71 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. *आज 8 नवीन मृत्यूमध्ये* सावरगांव ता. चिमुर जि. चंद्रपूर येथील 69 वर्षीय पुरुष, तर गडचिरोली तालुक्यातील 46 वर्षीय महिला, तालुका आरमोरी जि. गडचिरोली येथील 51 वर्षीय पुरुष, तालुका ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर येथील 60 वर्षीय महिला, तालुका अहेरी जि. गडचिरोली येथील 61 वर्षीय पुरुष, ता. भामरागड जि. गडचिरोली येथील 52 वर्षीय पुरुष, नागपूर जिल्ह्यातील 86 वर्षीय महिला तसेच ता. आरमोरी जि. गडचिरोली येथील *प्रीटर्म बेबी* यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे.

नवीन 305 बाधितांमध्ये *गडचिरोली तालुक्यातील 149,* अहेरी तालुक्यातील 6, आरमोरी 28, भामरागड तालुक्यातील 5, चामोर्शी तालुक्यातील 12, धानोरा तालुक्यातील 10, एटापल्ली तालुक्यातील 10, कोरची तालुक्यातील 12, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 19, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 3, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 3 तर *वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 48* जणांचा समावेश आहे.