प्रतिनिधी // इरफान शेख
सिरोंचा दि. 13 एप्रिल
गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी आज सिरोंचा तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान सिरोंचा ग्रामीण रुग्णालयास भेट दिली व रुग्णालयाची पाहणी केली तसेच रुग्णांची आस्थेने विचारपूस केली व रुग्णालयात असलेल्या औषध साठा तथा यंत्रसामुर्गी बाबतची माहिती जाणून घेतली असता रुग्णालयात व्हेंटिलेटर व डायलिसीस युनिट नसल्याचे लक्षात आले. याची दखल घेऊन खासदार अशोक नेते वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून लवकरच सिरोंचा ग्रामीण रुग्णालयाला व्हेंटिलेटर व डायलिसीस युनिट उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, ज्येष्ठ नेते दामोदरजी अरगेला, राज्य परिषद सदस्य सत्यनारायण मंचेरलावार, तहसीलदार सय्यद हमीद, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी विश्वास पाटिल, भाजपचे तालुका अध्यक्ष शंकर नरहरी, माधवजी कासारलावार, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ कन्नाके, डॉ शशिकला, डॉ महेंदर पेद्दाला, राजेश संतोषवार, बेडके तिरुपती, संदीप दागम उपस्थित होते.