3 एप्रिल पासून तहसीलदार, नायब तहसीलदार संघटना बेमुदत काम बंद आंदोलन

3 एप्रिल पासून तहसीलदार, नायब तहसीलदार संघटना बेमुदत काम बंद आंदोलन

सर्व तहसीलदार आणि नायाब तहसीलदार संघटनेच्या वतीने आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांना दिले निवेदन

आरमोरी:संपूर्ण महाराष्ट्र राज्यात दिनांक 3 एप्रिल 2023 पासून तहसीलदार तसेच नायब तहसीलदार संघटना हे काम बंद आंदोलनात सहभागी होणार असल्याचे निवेदने आपल्या स्तरावरून आमदार, खासदार तसेच शासनाला दिलेले आहे. सविस्तर वृत्त असे की तहसीलदार तसेच नायाब तहसीलदार संघटनेच्या वतीने वेतनामध्ये ग्रेट पे 4300 वरून 4800 करण्यात यावे. या मागणीसाठी गडचिरोली जिल्ह्यातील तहसीलदार नाय तहसीलदार संघटना दिनांक 3 एप्रिल 2023 पासून बेमुदत काम बंदचे आंदोलन पुकारले आहे. या आशियाचे पत्र आज दिनांक 31 मार्च 2023 रोजी आरमोरी तहसील कार्यालय यांच्या प्रांगणात सर्व तहसीलदार आणि नायाब तहसीलदार संघटनेच्या वतीने आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांना हे निवेदन देण्यात आलेले आहे. सदर निवेदन आमदार कृष्णा गजबे यांनी स्वीकारले असून सदर बाबीचा पाठपुरा आपण शासनाकडे करण्यात करणार असल्याचे मत आमदार कृष्णा गजबे यांनी व्यक्त केले.

यावेळी आमदार कृष्णा गजबे, यांना निवेदन देताना आरमोरीचे तहसीलदार श्री कल्याण कुमार डहाट नायब तहसीलदार श्री हरिदास दोनाडकर नायब तहसीलदार ललित कुमार लाडे तहसीलदार श्री संजय राठोड नायब तहसीलदार श्रीमती उत्तरा राऊत कर्मचारी महासंघाचे श्री चंदू भाऊ प्रधान यांनी निवेदन आमदार महोदय यांना दिले हे.
निवेदन स्वीकारताना आमदार कृष्णा गजबे यांच्यासोबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा आरमोरी येथील भाजपाचे तालुकाध्यक्ष नंदू भाऊ पेट्टेवार कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्री ईश्वरजी पासेवार रत्नाकर सावकार धाईत आदी मंडळी उपस्थित होते.