माहीलाम्मा देवी मंदिरात बोनालू उत्सव
माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी घेतले आशीर्वाद
ओडीगुडम येथील तीन दिवसीय कार्यक्रमात भाविकांची एकच गर्दी
अहेरी:-तालुक्यातील बोरी लगत आणि प्राणहिता नदीच्या काठावर वसलेल्या ओडीगुडम येथे आयोजित तीन दिवसीय बोनालू उत्सवात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे.माहीलम्मा देवी मंदिरात सुरू असलेल्या बोनालू उत्सवात माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम यांनी भेट देऊन पूजाअर्चा करून आशीर्वाद घेतले.
बोरी वरून दक्षिणेस 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या ओडीगुडम येथे अगदी प्राणहिता नदीच्या काठावर असलेल्या माहीलम्मा देवी मंदिरात दरवर्षी बोनालू उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो.त्या अनुषंगाने याही वर्षी 26 ते 28 मार्च दरम्यान येथे बोनालू उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात जिल्ह्याच्या दक्षिण भागातून आणि लगतच्या तेलंगाणा राज्यातून हजारो भाविकांनी हजेरी लावली.विशेष म्हणजे याठिकाणी दुरून येणारे भाविक मुक्कामाणे राहतात.त्यामुळे गावातील प्रत्येक घरात भाविक पाहुण्यांसाठी थांबण्याची व्यवस्था करण्यात येते.
या तीन दिवसीय बोनालू उत्सवामुळे ओडीगुडम गावात मोठी जत्रा भरते.26 आणि 27 मार्च दोन दिवस देवांचे बोनालू कार्यक्रम व 28 मार्च रोजी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.27 मार्च रोजी भाग्यश्री आत्राम यांनी भेट देऊन आशीर्वाद घेतानाच आलेल्या भाविकांची आस्थेने विचारपूस केले.तसेच मुक्कामाणे असलेल्या भाविकांची गैरसोय होणार नाही,याची काळजी घेण्याचे आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना केले.यावेळी परिसरातील राकॉचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.