ओड्डीगुडाम येथे बोनालु कार्यक्रमाला माजी जी प अजय कंकडालवार यांची उपस्थिती

 

अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत राजपूरपॅंच अंतर्गत ओड्डीगुडाम येथील जय महिलम्मा देवीच्या बोनालू पूजा कार्यक्रम आयोजित करण्यात आले.दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा ओड्डीगुडाम येथे महिलम्मा बोनालू कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले.महिलम्मा बोनालू कार्यक्रमाला लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मा.श्री. ( Ajjubhau ) अजयभाऊ कंकडालवार व अहेरी अहेरी पंचायत समितीचे माजी उपसभापती सौभाग्यवती सौ. सोनालीताई अजय कंकडालवार यांनी उपस्थिती राहून देवीची दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनतेला सुख : शांती समाधान व उत्तम आरोग्य लाभावे अशी महिलम्मा देवी कडे प्रार्थना केली..!!

यावेळी उपस्थित माजी जिल्हा परिषद सदस्य सुनीत कूसनाके,माजी सरपंच रामुलू कुळमेथे,माजी सरपंच महेश सेडमाके,माजी उपसरपंच सुरेश गंगाधीरवार,माजी उपसरपंच पांडुरंग रामटेके,ग्रा.पं.सदस्य संतोष पंदीलवार,दिनेश मडावी,जांपन्न, मारोती अण्णा, महेश अण्णा,पोरतेट भाऊ,अजय नैताम,रविंद्रभाऊ,राकेश सडमेक,रवी भोयर,प्रकाश दुर्गेसह आविसं व अजयभाऊ मित्रा परिवारचे कार्यकर्ते व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिती होते