#khabardarmaharashtr#onlinenewsportal#sports#education#political#crime
श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सातारा घरफोडी व चोरीचे गुन्हे उघड करण्याच्या सूचना, अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना दिल्या आहेत. त्याप्रमाणे अरुण देवकर पोलीस निरीक्षक यांनी रविंद्र भोरे सहायक पोलीस निरीक्षक व अमित पाटील पोलीस उपनिरीक्षक यांच्या अधिपत्त्याखाली एक विशेष पथक तयार केलेले आहे.
दिनांक २५/३/२०२३ रोजी अमित पाटील पोलीस उपनिरीक्षक व स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार दहीवडी पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रतिबंध करण्याकरीता पेट्रोलींग करीत असताना बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, दहिवडी बाजूकडून सातारा बाजूकडे अशोक लेलंड टेम्पो क्र. एम.एच.१९ डी.डी. २३३४ व मारुती अल्टो कार क्र. एम.एच.०४ डि.जे. ४११५ मधून चोरीचा माल घेवून काही इसम येत आहेत अशी माहिती मिळाल्याने पोउनि पाटील व पोलीस अंमलदार यांनी पिंगळी फाटा ता.माण जि.सातारा येथे सापळा लावून बातमीतील वाहने पकडून वाहनातील पोलीस अभिलेखावरील आरोपी १) अमर बापूसाहेब देवगुडे वय २६ वर्षे रा. खोकडवाडी ता. जि. सातारा २) संतोष शामराव सोनटक्के वय २५ वर्षे रा.भांडवली ता.माण जि.सातारा अशी असल्याचे व अल्टो कार मधील इसमांनी त्यांची नांवे ३) विनोद निवृत्ती खरात वय २५ वर्षे रा. श्रीनगर नवीन एम. आय. डी. सी. सातारा मुळ रा. भालवडी ता.माण जि.सातारा ४) शशांक दिपक जाधव वय २१ वर्षे रा. खोकडवाडी ता. जि. सातारा यांच्या ताब्यातून जनरेटर, फ्रिज, संगणक, प्रिंटर, सोफासेट, गॅस शेगडी, पितळी मुयां, एल.सी.डी. टीव्ही, पिठाची चक्की, सिलेंडर, उसाचे गुराळ, मोपेड मोटार सायकल, टेम्पो व अल्टो कार असा एकुण १०,४५,२५०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन रहिमतपूर पोलीस ठाणे गुरनं ६ / २०२३ भादंवि कलम ३८०, ४५७, आँध पोलीस ठाणे गुरनं २१५ / २०२२ भादंवि कलम ४५४,४५७,३८० दहिवडी पोलीस ठाणे गु.र.नं. २४९/२०२३ भादविक ४५४, ४५७, ३८० सातारा तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. २७४ / २०२२ भादविक ४५४, ४५७, ३८०, पुसेगांव पोलीस ठाणे गुरनं ६८ / २०२३ भादंवि कलम ३७९, चिपळून पोलीस ठाणे जि.रत्नागिरी गुरनं ७३ / २०२३ भादंवि कलम ३७९ असे एकुण ४ घरफोडीचे व २ चोरीचे गुन्हे उघड केले आहेत.
सदर कारवाईमध्ये श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, श्री बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, सपोनि संतोष पवार, रविंद्र भोरे, पोउनि अमित पाटील, विश्वास शिंगाडे, पोलीस अंमलदार उत्तम दबडे, अतिश घाडगे, संतोष पवार, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, निलेश काटकर, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, गणेश कापरे, मोहन पवार, प्रविण कांबळे, विक्रम पिसाळ, रोहित निकम, सचिन ससाणे, पृथ्वीराज जाधव, मयुर देशमुख, शिवाजी गुरव यांनी सहभाग घेतला असून कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, श्री बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.