सिंदा (टेकुलगुडा) येथे माजी.जी.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन

 

अहेरी;- तालुक्यातील देचिली ग्रा.प.अतंर्गत येणाऱ्या सिंदा (टेकूलगुडा) येथे जय पेरसापेन सिंदा क्लब यांच्या कडून भव्य टेनिस बाल क्रिकेट स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले होते.सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला पारितोषिक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या कडून तर दूसरा पारितोषिक माजी जि.प.सदस्य श्री.अजयभाऊ नैताम व माजी पं.स.सभापती सौ.सुरेखाताई आलाम ,व तिसरा पारितोषिक स्व.अजय वेलादी स्मृती प्रीत्यर्त जय पेरसापेन क्रिकेट क्लब यांच्या वतीने असे तीन पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे.आज सदर स्पर्धेचे उदघाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.श्री.अजय नैताम माजी जिल्हा परिषद सदस्य,सुरेखाताई आलाम माजी पंचायत समिती सभापती अहेरी,शैलेंद्र पटवर्दन न.प.उपाध्यक्ष अहेरी,डॉ.सुंदर नैताम,विनोद मडावी,हनमन्तु सडमेक,श्री.सत्यम नीलम माजी सरपंच देचली, प्रकाश दुर्गे,विनोद रामटेके,नरेंद्र गर्गम,राकेश सडमेक होते..!!

यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री.साई कोडापे,उपाध्यक्ष:-गंगाराम आत्राम,सचिव :- लक्ष्मण सडमेक,क्रीडा सचिव:-विनोद मडावी,क्रीडा प्रमुख:- नामदेव कोडापेव गावातील पुरुष,महिला,खेळाडू उपस्थित होते..!!