भीषण अपघातात एक जागीच ठार

 

#Khabardarmaharashtr#onlinenewsportal#crime#sports#education#political#accedent#

गडचिरोली:-गडचिरोली वरुन 15 कि.मी. अतंरावरील पोर्ला फॉक्टरी जवळ बसने एका इसमास चिरडले त्यामुळे तो युवक जागीच ठार झाला. फॉक्टरी रहिवासी अर्जुन बारसागडे वय 25 हा युवक दि. 17 ला शुक्रवारी सांयकाळी 7 वाजता मोह झरी वरून येत होता एवढ्यात नागपूर वरून गडचिरोली कडे भरधाव वेगाने एस. टी. महामंडळाची बस येत होती. अचानक अर्जुन फॉक्टरी कडे जात असतांना अपघात घटला व बसच्या धडकेने अर्जुन जागीच ठार झाला. बघ्याची गर्दी झाली होती. गडचिरोली पोलिस घटनास्थळी पोहचुन पंचनामा केला व प्रेत सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे पाठविण्यात आले. गडचिरोली पोलीस अधिक तपास करीत आहे. सदर युवकाच्या अपघाती निधनामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात आले.