उपजिल्हा रुग्णालयात महिला दिनाचे औचित्य साधून रुग्णांना फळ व बिस्कीट वाटप

 

 

गडचिरोल्ली उपजिल्हाप्रतिनिधी//मारोती कोलावार

अहेरी:- दिनांक 8 मार्च ला -आंतरराष्ट्रीय महीला दिनाचे औचित्य साधून कापेवार -बेलदार महीला मंडळ अहेरी च्या वतीने ग्रामीण रुग्णालय अहेरी येथे फळ व बिस्किट वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आले,सर्व गरजू रुग्णांना फळे व बिस्कीट देऊन त्यांच्या आरोग्याची विचारपुस करण्यात आले. या प्रकारे अहेरी येथे महिला दिन साजरा करण्यात आले. या कार्यक्रमाला समाजाचे अहेरी नगरपंचायत चे माझी नगराध्यशा प्राजक्ताताई पेद्दापल्लीवार, माधवीताई मुक्कावार, मंजुषाताई जिलकरवार , पद्माताई मुक्कावार, रेणुकाताई मुक्कावार, सरिताताई मुक्कावार, सारिकाताई गडपल्लीवार, सरिताताई पारेल्लीवार, श्रुती नामनवार, रुचिता ताई पेद्दापल्लीवार, हे समाज भगिनी उपस्थित होते