त्या १२ विच्या परीक्षार्थी विद्यार्थ्याने मानले मुस्लिम बांधवांचे आभार

 

#Khabardarmaharashtr#onlinenewsportal#sport#education#political#crime

 

 

गडचिरोल्ली;-बारावी बोर्डाच्या परीक्षेला राज्यभरात 21 फेब्रुवारी पासून सुरूवात झाली आहे. कोविडच्या साथीनंतर दोन वर्षांनी पुन्हा पूर्ववत परीक्षा नेहमीप्रमाणे ऑफलाईन झाली आहे

सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु झाल्या आहेत. परीक्षेच्या काळात जेव्हा विद्यार्थी सकाळी उठून अभ्यास करतो. अभ्यास करताना परिसरात आजूबाजूला मशिदीवर जे भोंगे लागले आहेत. त्या भोंग्याच्या आवाजामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करताना अडचण येते. त्यामुळे त्यांची गुणवत्ता कमी होत आहे. हे भोंगे परीक्षेच्या काळात बंद राहावेत.म्हणून जारावंडी येथील मुस्लिम बांधवांनी नमाजाच्या वेळी भोंगे लावण्याचे टाळले आहे

बारावीची परीक्षा सुरू असून जारावंडी हे बारावी आणि दहावीचे परीक्षा केंद्र आहे या केंद्रावर जारावंडी कसनसुर आणि जंभिया या शाळेचे विध्यार्थी परीक्षा देण्याकरिता आले आहेत बारावीचे दोन पेपर झालेले आहेत आणि येणाऱ्या दिवसात दहावीची परीक्षा सुरू होणार असून दहावीचे विद्यार्थी सकाळी उठून अभ्यास करतात अशात दिवसातून पाच वेळा मशिदीवर भोंगे लावून नमाज पडले जायचे त्यामुळे विद्यार्त्यांच्या अभ्यासात अडचणी निर्माण होतात आणि परीक्षा केंद्रापासून जवळच मस्जित असल्याने विध्यार्थ्यांना अडचणी निर्माण होऊ नये म्हणून येथील मुस्लिम बांधव बाबाजान पठाण,बब्बू शेख,रमजान पठाण सलीम पठाण इस्राएल शेख ,अस्लाम पठाण अजित शेख आदी लोकांनी पुढाकार घेऊन
स्वतः माजिद्दीवरील भोंगे बंद करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे आज यांच्या या कार्यामुळे मुस्लिम बांधवांचे नागरिकांमधून कौतुक आणि परीक्षार्थी विध्यार्थ्यांकडून आभार व्यक्त केले जात आहे

 

 

_सर्वात पहिले आम्ही मुस्लिम बांधवांचे आभार मानतो की त्यांनी आमच्या परीक्षेसाठी आपल्या अध्यात्मिक कार्यांना त्याग केला आणि आमच्या अभ्यास आणि परीक्षा सुरळीत चालावे म्हणून जे कार्य केले ते मोलाचे आहे_

चेतन दादाजी मोहूर्ले
बारावी वर्ग
परीक्षार्थी विध्यार्थी जारावंडी