#Khabardarmaharashtr#onlinenewsportal#social#political#education#crime
२० वर्षापासून काम पूर्णत्वास न गेल्यामुळे महानगरपालिका, शासन व समाजाचे मोठे नुकसान झाल्याने विधानसभेच्या माध्यमातून न्याय देण्याची केली मागणी
कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत कल्याण येथील “आर्ट गॅलरी म्युझियम आणि व्यापारी संकुल” या प्रकल्पास जाणीव पूर्वक अडचणी निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची केली मागणी
दिनांक ३/३/२०२३ मुंबई
कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत विकास योजनेच्या आरक्षण क्रमांक २७ नुसार लालचौकी कल्याण येथील “आर्ट गॅलरी म्युझियम आणि व्यापारी संकुल” प्रकल्प शासनाच्या व मनपाच्या सर्व नियम व अटी पाळून १० वर्षापासून बांधून तयार असतानाही स्थानिक समितीमधील अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक निर्माण केलेल्या अडचणीमुळे हा प्रकल्प पूर्णत्वास गेला नाही. त्यामुळे हा प्रश्न निकाली काढून महानगरपालिका, शासन व समाजाला न्याय देणार का व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का? असा प्रश्न आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून विधानसभेत उचलला.
यावेळी मंत्री उदय सामंत यांनी याबाबत सकारात्मक उत्तर दिले.
*यावेळी आमदार डॉ देवराव होळी , यांचे सह मा. आमदार योगेशजी सागर व मा. आमदार खेडेकर साहेब यांनीही या चर्चेत सहभाग घेतला. २० वर्षापासून काम पूर्णत्वास न गेल्यामुळे महानगरपालिका, शासन व समाजाचे मोठे नुकसान झाल्याची बाब त्यांनी विधानसभेच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे मागील २० वर्षांपासून प्रलंबीत असणारे हे प्रकरण तातडीनं निकाली काढावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच हे प्रकल्प पूर्णत्वास न नेता जे अधिकारी यात जाणीवपूर्वक अडचणी निर्माण करित आहेत त्यातील दोषींवर कठोर कारवाही करावी अशी मागणीही त्यांनी या लक्षवेधीच्या माध्यमातून राज्य सरकारकडे केली