गॅस दरवाढीवरुन महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक

 

Khabardarmaharashtra#onlinenewsportal#politicalnews#social#crime

गॅस दरवाढीवरुन महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक
विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत जोरदार घोषणाबाजी…

अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली गॅस दरवाढीविरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत शिंदे सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

होळी रे होळी, सरकारने थापली गॅस दरवाढीची पोळी, संपला निवडणुकीचा तडाखा, झाला गॅस दरवाढीचा भडका, रद्द करा रद्द करा… गॅस दरवाढ रद्द करा, खोके सरकार आले सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, खोके सरकार आले गॅस दरवाढीचे विघ्न आणले, अशा गगनभेदी घोषणांनी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.