साडेतीन लाखांचे सागवान जप्त गडचिरोल्ली जिल्ह्यातील घटना

Khabardarmaharashtr#online news portal#social#politice#education#crime

 

 

गडचिरोल्ली;-सिरोंचा तालुक्यातील आसरल्ली वन क्षेत्रात येणाऱ्या नडीकुडा गावालगत गोदावरी पात्रात वनविभागाने छापा टाकून साडेतीन लाख रुपयांचे सागवान जप्त केले. दरम्यान, तस्कर फरार असून त्याचा शोध सुरू आहे. ही कारवाई पहाटे केली.

 

 

नकुडा येथे सागवान लाकडे कापून तस्करी होत असल्याची माहिती सिरोंचा वनविभागाला मिळाली होती. त्याआधारे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून छापा टाकला. या वेळी ३ लाख ५४ हजार

 

रुपयांचे ३२ नग सागवान लाकूड जप्त केले.कारवाईदरम्यान अंधाराचा फायदा घेत तस्कर फरार झाला. सिरोंचा येथील वनक्षेत्र अधिकारी पी. एम. पाझारे, आसरल्ली वन क्षेत्रातील अधिकारी कादीर शेख, नीलम, वनरक्षक सतीश जाकावार या वेळी आदी सहभागी होते.