भामरागड : येथील वॉर्ड क्रमांक 7 मध्ये ग्रामीण रुग्णालयाची इमारत आहे. या रुग्णालयाच्या संरक्षण भिंतीला जुन्या इमारतीच्या मागे कित्येक वर्षांपासून काही नागरिक घरे बांधून वास्तव्यास आहेत. सदर संरक्षण भिंतीला लागून नाही नसल्याने सांडपाणी वाहून जाण्यास अडचण निर्माण होत आहे. यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.
रुग्णालय इमारतीच्या संरक्षण भिंतीला लागून वास्तव्यास असलेल्या नागरिकांना सांडपाणी निचऱ्यासाठी नाली आवश्यक असल्याने प्रदीप धानोरकर ते जोगेंद्र मडावी यांच्या घरापासून मुख्य द्वारापर्यंत सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाली बांधकामासाठी नगर पंचायत भामरागड यांना अधीक्षक यांनी आपल्या अधिनस्त कार्यक्षेत्रातून मंजुरी द्यावी. अशी मागणी तालुका शाखा शिवसेनेने निवेदनातून भामरागड ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक यांना केली. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख खुशाल मडावी, भामरागड नगर पंचायत नगर सेवक गजानन उईके, युवा सेना तालुका प्रमुख दिनेश मडावी उपस्थित होते.