खाजगी जागेवरील विद्युत जनित्र हटवा – शिवसेनेची मागणी

 

भामरागड : भामरागड येथील ईश्वर अनवरशहा मडावी यांच्या खाजगी जागेत विद्युत जनित्र असून या जनित्र वरून मुख्य वीज प्रवाह लाईन गेलेली आहे. यामुळे सदर आदिवासी बंधवाला पक्के घर बांधण्यास अडथळा निर्माण होत असल्याने त्यांच्या खाजगी जागेवरील विद्युत जनित्र इतरत्र हटविण्याची मागणी वीज वितरण कंपनी शाखा भामरागड चे कनिष्ठ अभियंता यांच्याकडे निवेदनातून शिवसेनेने केली आहे.

सदर विद्युत जनित्र हटवून पक्के घर बांधकामास सहकार्य करण्यात यावे. अन्यथा दिरंगाई झाल्यास शिवसेना कनिष्ठ अभियंता यांच्याविरोधात वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख खुशाल मडावी, शिवसेना नगरसेवक गजानन उईके, युवा सेना तालुका प्रमुख दिनेश मडावी आदींची उपस्थिती होती.