आर्वी त प्रहारचे ढोलताशा आंदोलन बँक ऑफ इंडिया कडून आर्थीक फसवणूक झालेल्यांसाठी बाळा जगताप यांचे आंदोलन

 

आर्वी :- ऑगस्ट २०२१ मध्ये बाळा जगताप यांनी शहरातील बँक ऑफ इंडिया मधील बँक मित्राने बँकेतील तत्कालीन कर्मचारी व व्यवस्थापक यांच्या संगनमताने करोडोचा अपहार केला होता. तो उघडकीस आणला होता. मात्र त्या घोटाळ्यात बँक मित्रासोबत लिप्त असणाऱ्या तत्कालीन शाखा व्यवस्थापक व बँक कर्मचारी यांच्यावर अजूनपर्यंत कोणतीही कार्यवाही बँक प्रशासनाने केलेली नाही. कार्यवाही न करता बँक प्रशासन त्या गुन्हेगारांना अभय तर देत नाही ना ? हा प्रश्न उभा राहत आहे. तत्कालीन कर्मचाऱ्यांवर कार्यवाही व्हावी व ज्या गरीब, शेतकरी ,शेतमजूर , निराधार यांचे पैसे बँक मित्र व कर्मचाऱ्यांनी धोक्याचे हडपले ते त्यांना तात्काळ मिळावे याकरिता आज बँक ऑफ इंडिया आर्वी च्या समोर प्रहार चे बाळा जगताप यांच्या नेतृत्वात सर्व पीडित खाते धारक व प्रहार कार्यकर्त्यांनी अखंड ढोल ताशा आंदोलन सुरू केले आहे. या आधी झालेल्या आंदोलन व बैठकीनंतर पीडित ग्राहकांना त्यांचे नुकसानाचे पैसे मिळणे चालू झाले होते. काही ग्राहकांना पैसे सुद्धा मिळाले मात्र नंतर माशी कोठे शिंकली कळलेच नाही.उर्वरित सर्वांना त्यांची नुकसान भरपाई मिळावी व तत्कालीन कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करावी. तत्कालीन कर्मचाऱ्यांवर कार्यवाही न करता बँक प्रशासन त्यांना यापेक्षाही मोठा दरोडा टाकण्याची सूट तर देत नाही ना ? हा प्रश्न यानिमित्ताने उभा होतो. या सर्व प्रकरणात सहभागी सर्वानची चौकशी तत्काळ त्यांच्या गुन्हे दाखल करून कार्यवाही करण्यात यावी. तसेच सर्वसामान्य, गरीब, शेतकरी, शेतमजूर अशा सर्व पीडित ग्राहकांना तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी बाळा जगताप यांनी आंदोलनादरम्यान केली.
या प्रकरणाला धरून वेळोवेळी बैठका आंदोलने झाली आश्वासने मिळाली मात्र त्याला बँक प्रशासन ने केराची टोपली दाखवली. त्यामुळे आम्ही आजपासून बँक समोर ढोल ताशा आंदोलन आंदोलन सुरू केले आहे. आता ठोस निर्णय लागल्याशिवाय माघार नाही असे बाळा जगताप यांनी सांगितले..