बोथली शिवारात वनविभागाच्या वनरक्षक कर्मचार्‍याचा अपघाती मृत्यू

 

देवळी तालुक्यातील नाचणगाव येथील रहिवासी असलेल्या व आर्वी तालुक्यातील वनविभाग पानवाडी येथे कार्यरत असलेल्या वन विभागाचे वनरक्षक कर्मचारी संजय शंकरराव पोलार वय ४९ हे आपल्या कर्तव्य वरून परत येत असताना चारचाकी वाहनाला धडक बसून झालेल्या अपघातात काल 29 मार्च रोजी त्याचा दुर्देवी मृत्यू झाला.
संजय पोलार हे पानवाडी येथील आपल्या कार्यालयात नाचणगाव येथून रोज जाणे-येणे करीत होते. सैन्यातील नोकरीतून निवृत्त झाल्यावर त्यांनी वन विभागामध्ये आपली सेवा सुरू केली होती
आपल्या सेवेतून सुट्टी झाल्यावर घरी परतत असताना बोथली गावाजवळ उभ्या असलेल्या कारला धडक बसल्याने संजय पोलार यांच्या मोटरसायकल क्र.MH-32AF 5131ला अपघात झाला व ते खाली पडले त्याला डोक्याला गंभीर दुखापत झाली
ह्या घटनेची माहिती मिळताच रोहना वनविभाग येथील क्षेत्र सहाय्यक श्री सतीश नितनवरे, बिटरक्षक रवींद्र राठोड,वनमजुर देवराव कुरवाडे व परिसरातील नागरिकांनी घटनास्थळ गाठून त्यांना रोहना येथील प्राथमिक आरोग्य केन्द्र येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले नंतर त्यांना पुलंगाव ग्रामीण रुग्णालयात त्यांना आणण्यात आले . पुलगाव येथील डॉ संदीप आकरे यांनी त्याला मृत घोषित केले त्यांच्यामागे आई वडील दोन भाऊ पत्नी दोन मुली व एक मुलगा बराच मोठा आप्तपरिवार आहे