वर्धा जिल्ह्यातील आर्वी व कारंजा येथे मनसेची घोडदौड

 

वर्धा जिल्ह्यातील आर्वी व कारंजा तालुक्याचा दौरा नुकताच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला या दौऱ्यात पक्ष प्रवेश, पदाधिकारी नियुक्ती, तसेच पक्ष बांधणीवर भर देण्यात आला, कारंजा (घाडगे) विश्रामगृहात कारंजा येथील पदाधिकारी संपन्न झाली,बैठकीला प्रामुख्याने उपस्थित मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंतभाऊ गडकरी यांच्या हस्ते संदीप धारपुरे  यांची तालुका अध्यक्षपदी तर सागर हिंगवे यांची तालुका संघटक व संदीप चौधरी यांची तालुका उपाध्यक्षपदी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या कारंजा तालुका अध्यक्षपदी उज्वल मानमोडे तर वाहतूक सेनेच्या तालुका संघटकपदी किशोर बोबडे यांची नियुक्ती करण्यात आली, तसेच कारंजा शहरातील एका शाखेचे व तालुक्यातील जुनापानी येथील शाखेची कार्यकारिणी गठीत करण्यात आली, त्यानंतर आर्वी येथील ईगल चौक येथे व पुरसुमल चौकात शाखा उदघाटीत करण्यात आली, नंतर खर्डी वार्डातील मैदानावर भव्य सभेचे आयोजन करण्यात आले, या सर्व ठिकाणी मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंतभाऊ गडकरी यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून संबोधित केले,गेल्या महिन्यात 12 फेब्रुवारी ला आर्वी च्या विश्रामगृहात मनसेची आढावा बैठक घेण्यात आली होती, त्यानंतर आजच्या शाखा उदघाटन , भव्य सभा, पदाधिकारी नियुक्ती, लोकांचे प्रवेश यामुळे आर्वी व कारंजा येथे मनसेची ताकद वाढते आहे , हेमंतभाऊ गडकरी यांच्या सोबत या दोन्ही तालुक्याच्या ठिकाणी याभागाचे मनसे उपजिल्हाअध्यक्ष व दौरा आयोजक *विजय वाघमारे*,मनविसेचे वर्धा जिल्हा अध्यक्ष शुभम दांडेकर, वाहतूक सेनेचे वर्धा जिल्हा संघटक रमेश घंगारे, श्याम पुनियानी, योगेश चनापे, संदीप धारपुरे, सागर हिंगवे,गणेश भाकरे,उमेश बारबैले, आतिष शिंगाने, राजेश गेडाम मंगेश घोटकर प्रविण काळे गौरव कुरहेकर हर्षल काळे देवा उईके शुभम वाघमारे विशु आगलावे पवन ढोले विपुल वाघमारे
अतुल जैसिंगपुर
ऋषभ बोराडे
दुर्गेश वाघमारे
व  व इतर उपस्थित होते.