समुद्रपूर :पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कुर्लागावातील शिवारामध्ये प्रेमीयुगुलांचा विहिरीत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. मृत्युक महैश शालिक ठाकरे वय २६ वर्ष राहणार बेला जिल्हा नागपूर तर एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. प्राप्त माहितीनुसार सोमवारी रात्री गावातील पोलीस पाटलांनी समुद्रपुर पोलिसांना माहिती देताच पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले पंचनामा केला पोलिसांनी अधिक शहानिशा केली असता हे प्रेमी युगल नागपूर जिल्ह्यातील बेला येथील रहिवासी असलेल्याचे निष्पन्न झाले.मृत मुलगी १६ वर्षीय अल्पवयीन आहे तर मुलगा २६ वर्षीय असून ते नागपूर जिल्ह्यातील बेला येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. काही दिवसापूर्वी या मुलाने गावातीलच मुलीला फूस लावून पळून नेले होते. त्यामुळे मुलीच्या घरच्यानी बेला पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार दिली होती. पोलिसांनी दोघांचे मृतदेह विहिरीतून काढून समुद्रपूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले असून पुढील तपास समुद्रपुर पोलिस ठाण्याचे ठाणेदार प्रशांत काळे करीत आहे.