आर्वी दि.२८:- माजी नगराध्यक्ष तथा समाजसेवक आर्वी वकील संघाचे जेष्ठ विधीज्ञ अँड प्रकाश कृष्णराव भुसारी यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी सोमवारी (ता.२८) दुपारी २.३० वाजता दुःखद निधन झाले असुन शहरात शोककळा पसरली आहे.
ते आर्वी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाकरिता झालेल्या थेट निवडणुकीत दोन वेळा जनतेमधुन निवडून आले होते. तत्पुर्वी नगर सेवक म्हणून सुध्दा कार्यरत होते. आपल्या सात वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या भ्रष्टाचार मुक्त कारभारामुळे ते लोकप्रिय ठरले.
त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ व बराच मोठा आप्तपरिवार आहे.