जिल्ह्यात महिलांसाठी सखी वन स्टॉप सेंटर सुरु

 

संकटग्रस्त महिलांना तातडीने मदत मिळण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयाकडून सखी वन स्टॉप सेंटरही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक सखी वन स्टॉप सेंटरसुरु करण्यात आले आहे. सखी वन स्टॉप सेंटर या नावाने प्रसिद्ध असलेली ही योजना १ एप्रिल २०१५ पासुन लागू करण्यात आली आहे.
सदर योजनेच्या निकषानुसार शारीरीक, लैगींक, भावनिक, मानसिक आणि आर्थिक शोषनाला बळी पडलेल्या अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलीसह सर्व महिलांना तथा आठ वर्षांखालील मुलांना आवश्यक ती मदत केली जाते. हिंसाचाराच्या विरोधात लढण्यासाठी एकाच छताखाली वैद्यकीय सेवा, कायदेशीर मदत व समुपदेशन, पोलीस मदत, तात्पुरती निवासाची सोय, मानसिक समुपदेशन, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधा, रेस्क्यु सर्विसेस व आपतकालीन सेवा तात्काळ उपलब्ध करुन दिल्या जातात.
हिंसाचारग्रस्त महिला पुढील प्रकारे सखी वन स्टॉप सेंटरमध्ये प्रवेश करू शकतात: स्वतः, सर्व नागरीक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, सार्वजनिक सेवक, नातेवाईक, मित्र, स्वयंसेवी संस्था, इत्यादीसह कोणत्याही व्यक्तीद्वारे किंवा महिला हेल्पलाइनच्या माध्यमातून, पोलीस स्टेशन, हॉस्पीटल आणि इतर आपतकालीन प्रतिसाद हेल्पलाइनसह सखी वन स्टॉप सेंटर येथे दाखल होवू शकतात.
केंद्र पुरस्कृत सखी वन स्टॉप सेंटरचे कार्यान्वय व नियंत्रण करण्यासाठी जिल्हाधिकारी, गडचिरोली यांचे अध्यक्षतेखाली तथा सदस्य/सचिव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गडचिरोली यांच्या नियंत्रणात केंद्र पुरस्कृत सखी वन स्टॉप सेंटर व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आलेली आहे. तसेच सदर योजनेचे कामकाज करण्याकरीता ईम्प्लीमेन्टींग एजन्सी म्हणून रुरल ॲन्ड अर्बन डेव्हल्पमेन्ट युथ असोशिएशन (रुदय), गडचिरोली या संस्थेची निवड करण्यात आलेली आहे.
तरी जिल्ह्यातील शोषीत व पीडीत महीला व युवतींनी वन स्टॉप सेंटर कडून देण्यात येणाऱ्या सेवांचा लाभ घ्यावा तथा अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस स्टेशन, रुग्णालय, नातेवाईक, यांनी आप आपल्या कार्यक्षेत्रातील संकटग्रस्त महीलांना केंद्र पुरस्कृत सखीवन स्टॉप सेंटर येथे पाठवून सामाजिक जबाबदारी पूर्ण करावी असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गडचिरोली यांनी केले आहेत.

: संपर्क :
महिला व बाल विकास विभाग
सखी वन स्टॉप सेंटर, गडचिरोली
पत्ता :- जुनी धर्मशाळा, जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, मुल रोड
कॉम्प्लेक्स, गडचिरोली
ई-मेल –oscgadchiroli1@gmail.com फोन न. 07132-295675
महिला हेल्पलाईन क्रमांक :- 181, 1098, 1091