जिल्हा प्रतिनिधी //उमंग शुक्ला
सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की श्री शशांक जगन्नाथ झिंगे, रा. पिंपळगाव रोड, हिंगणघाट हे मौजा उमरी येडे येथील श्री यशवंत शिंदे यांचे क्रेशर गिट्टीखदानांवर दिवानजी म्हणुन काम करतात. फिर्यादी काम कंपनीमध्ये पोकलँड, क्रेशर मशीन जनरेटर, टिप्पर असल्याने कंपनीमध्ये नेहमी डिझेलची आवश्यकता असल्याने फिर्यादी हे डिझेल ड्रममध्ये भरून कंपनीचे आतील शेड मध्ये ठेवीत असत. दिनांक १८-०३-२०२२ रोजी कोणीतरी अनोळखी इसमाने मोटारसायकलीचे मदतीने त्यांचे शेडमध्ये ठेवुन असलेल्या डिझेल पैकी ७० लिटर डिझल किंमत ७४३९/- रू. चा माल चोरून नेला. सदर प्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे अप. क्र. ३४७/२०२२ कलम ३७९, ३४ भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याची तात्काळ दखल घेवून गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी नामे १) दिलीप शारावजी राउत, वय ४० वर्ष, काम शेतमजुरी, रा. धामनगांव, ता. हिंगणघाट, जि. वर्धा व २) कृष्णा उर्फ छोटु मोहनराव वाघाडे, वय २८ वर्ष, रा. धामनगांव यांना निष्पन्न केले. त्यांना ताब्यात घेवून त्यांचे ताब्यातुन १) ७० लिटर डिझेल किंमत ७४३९/- रूपये, २) दोन प्लास्टिक कॅन प्रतिकॅन किंमत ५००/- रूपये प्रमाणे १०००/- रूपये, ३) एक बजाज प्लाटीना मोटारसायकल क्रमांक एमएच-३२ एडी-०३६३ किंमत ३०,०००/- रूपये असा एकुण ३८,४३९/- रू. चा माल जप्त करून गुन्हा नमूद गुन्हा उघडकीस आणला.
सदरची कार्यवाही मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत होळकर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. यशवंत सोळंखे, उपविभागिय पोलीस अधिकारी, हिंगणघाट श्री. दिनेश कदम यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. संपत चव्हाण यांचे निर्देशानुसार पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ टापरे व गुन्हे प्रकटीकरण पथकातिल पोलीस अंमलदार विवके बनसोड, पंकज घोडे, प्रशांत वाटखेडे, उमेश बेले यांनी केली.