भीम जयंती’निमित्त भव्य मिरणूका काढण्याची परवानगी द्या!  जयदीप कवाडे यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

 

नागपूर.
विश्वरत्न परम पुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त विविध सार्वजनिक सांस्कृतिक देखाव्यांसह मिरवणुकीस परवानगी द्यावी,अशी आग्रही मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीपभाई जोगेंद्र कवाडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.जयदीप कवाडे यांनी नुकतीच यासंबंधी मुख्यमंत्र्यांसोबत दुरध्वनीवरून चर्चा करीत आंबेडकरी जनतेच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहचवल्या.शिवाय ई-मेल च्या माध्यमातूनही त्यांनी पक्षाच्या वतीने समाजाच्या भावना राज्य सरकारपर्यंत पोहचवल्या आहेत.

कोरोना महारोगराईमुळे सामाजिक दायित्वाचे वहन करीत अत्यंत साधापद्धतीने आंबेडकरी अनुयायांनी डॉ.बाबासाहेबांचा जन्मदिवस साजरा केला. आता कोरोना महारोगराई जवळपास आटोक्यात आली आहे. अशात आंबेडकरी जनतेच्या भावनेचा विचार करीत भव्य मिरवणूका काढण्याची परवानगी देण्याची मागणी जयदीप कवाडे यांनी केली आहे.

आंबेडकरी जनतेच्या भावनांचा विचार करीत या मागणीस शासनाने सकारात्मक प्रतिसाद देत याविषयी लवकरच उच्च स्तरावरील बैठक घेण्यात येईल.बैठकीतून या संबंधी तोडगा काढला जाईल असे आश्वासन राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे साहेब यांनी दिले असल्याची माहिती जयदीप कवाडे यांनी दिली आहे.