महिला वकिलावर हल्ला प्रकरणी आष्टी वकील संघाचा कामकाजावर बहिष्कार

 

 

जिल्हा प्रतिनिधी //उमंग शुक्ला

 

वर्धा येथे महिला वकिलावर न्यायालय परिसरात झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज २५ मार्च रोजी आष्टी वकील संघाने कामकाजावर बहिष्कार करू त्या हल्ल्याचा निषेध नोंदवला.
वकीलावर होणारे हल्ले ही चिंतेची बाब असल्याने भविष्यात वकील सुद्धा न्यायालयात सुरक्षित राहू शकणार नाही, वकिलांचे जीवाला सुद्धा धोका निर्माण झाल्याने त्यामुळे वकिलांच्या सुरक्षिततेसाठी एडवोकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू करावा व ज्या व्यक्तीने महिला वकिलांवर हल्ला केला त्या व्यक्तीवर कडक कायदेशीर कारवाई करावी व भविष्यात अशा प्रकारचे हल्ले होऊ नये म्हणून वकिलांना सुरक्षा प्रदान करावे या हेतूने आज आष्टी वकील संघाने नियमित कामकाजावर बहिष्कार टाकला.
आष्टी वकील संघाचे अध्यक्ष ॲड श्री के बी मतले यांनी आज इतर वकिलांचे हजेरीत निषेध व्यक्त करून त्याबाबतचे निवेदन दिले. त्यावेळी आष्टी वकील संघाचे सदस्य ऍड जे. डी. जाणे, यु एस बेलेकर, पी
एम. गायकवाड, एम आर ठोंबरे. ऍड बोडखे, एड गावंडे हजर होते.