अमरभाऊ काळे मित्र परिवार तर्फे व्हाॅलीबाॅल चे २१वयोगटातील मुला , मुलींचे निवड चाचणी स्पर्धा संपन्न

 

प्रतिनिधी //अभिषेक शुक्ला

आर्वी:  क्रिडा संकूल येथे महाराष्ट व्हाॅलीबाॅल असोशिएसन यांच्या माध्यमातून २१ वर्ष वयोगटातील मुला , मुलींचे सामने घेण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक मा. अमरभाऊ काळे , महाराष्ट काॅंग्रेसचे महासचिव यांच्या हस्ते पार पडले . या प्रसंगी खेळाडूंना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले व सर्व खे़ळाडुना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले श्री सुनील साकळे सर महा. व्हाॅलीबाॅल असोशिएसन चे कोषाध्यक्ष व जितूभाऊ जिवतोडे , सह सचीव ,तालूका क्रिडा अधिकारी श्री प्रशांत दोंदल सर , मथे सर , रामू राठी , गोरव मोहोड , अनेक भाऊचे कार्यक्रते उपस्थित होते मा. अमरभाऊ काळे यांच्या हस्ते मा. साकळे सर , मा. जिवतोडे सर , मा. दोंदल सर , मा. मथे सर यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . नागपूर विभागातील ६2 युवक व २७ युवती सहभागी होत्या या मधून १२ युवक व १२ युवती या या खेळाडूंची निवड राज्यस्तरा करीता झाली . या स्पर्धे चे प्रस्तावीक श्री दिलीप जाधव यांनी केले कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालक अवीनाश गोहाड तर आभार वैभव काळे नी मानले ही स्पर्धा यशस्वी करण्या करीता छोटूभाऊ शर्मा श्रीकांत गुल्हाने , अनुप महाजन ,विशाल बोके , सागर शिरपूरे , पडोले , अमरभाऊ काळे मित्र परीवारानीं परिश्रम घेतले

 

चे