कपिल ठाकूर यांना आदर्श राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त

 

आर्वी तालुका प्रतिनिधी //लखन दाभने

क्रीडा क्षेत्रामध्ये सर्वात मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणजे राज्य आदर्श क्रीडा पुरस्कार त्याचे मानकरी आर्वी चे कन्नमवार विद्यालयाचे पर्यवेक्षक व तालुका क्रीडा मार्गदर्शक कपिल ठाकूर यांना दोंडाईचा धुळे जिल्हा या ठिकाणी दिनांक 20.03.2022.. रोजी प्राप्त झाला याकरिता आर्वी शहरांमध्ये पुन्हा एकदा क्रीडा क्षेत्रामध्ये मानाचा तुरा रोवला गेला कपिल ठाकूर सतत 28 वर्षांपासून हॉलीबॉल या खेळा मध्ये विविध वयोगटांमध्ये खेळाडू तयार करत असतात त्याची फलश्रुती हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला संपूर्ण महाराष्ट्रातून क्रीडा शिक्षकांच्या फाईल महाराष्ट्र राज्य क्रीडा संघटना यांनी मागविल्या होत्या त्या आधारे त्याची छाननी करून हा पुरस्कार जाहीर करण्यात आला हा पुरस्कार अर्जुन अवार्ड प्राप्त काका पवार प्रो कबड्डी खेळाडू महेंद्र सिंग राजपूत महाराष्ट्र राज्य क्रिडा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर क्रीडा व युवक सेवा संचानालया चे संचालक चंद्रकांत जी कांबळे धुळे चे जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव क्रीडा व युवक सेवा संचालनालय उपसंचालक सुनंदा पाटील यांच्या हस्ते कपिल ठाकूर यांना प्राप्त झाला त्याकरिता आर्वी शहरामध्ये उत्साहाचे वातावरण आहे