माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने मंत्रालयाच्या त्रिमुर्ती प्रांगणात राज्य शासनाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त चित्रमय प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनास महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी भेट दिली व महासंचालनालयाच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (प्रशासन) गणेश रामदासी व संचालक (वृत्त व जनसंपर्क) दयानंद कांबळे उपस्थित होते.
महिला व बाल विकास मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, ‘दोन वर्ष जनसेवेची, महाविकास आघाडीची’या संकल्पनेवर आधारीत सुंदर प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. शासनाने कोवीड काळात घेतलेले महत्त्वाचे निर्णय,योजना व उपक्रमांची माहिती देणारे हे प्रदर्शन आहे. महिला आणि बालकांच्या विकासासाठी काम करत असताना कोरोनाचे संकट असतानाही अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेत त्यांची अंमलबजावणी महिला व बालविकास विभागाने केली आहे, असेही ॲड. ठाकूर यांनी सांगितले.
यावेळी ॲड.यशोमती ठाकूर यांनी प्रदर्शनातील ३६० डिग्री सेल्फी पॉईंट येथे भेट देऊन, शासनाच्या प्रसिद्धीचे फलक घेऊन व्हिडीओ सेल्फीही घेतला.