शिवसेना वर्धा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

 

शिवसेना वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख मा. श्री. अनंतराव गुढे यांनी दि.१४ मार्च २०२२ रोजी वर्धा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या असून वर्धा विधानसभा उपजिल्हा प्रमुख पदी साहसिक जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री.रविंद्र कोटंबकर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली तर महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिंव्ह बँकेचे निवृत्त शाखा व्यवस्थापक श्री.राजेंद्र किटे यांची वर्धा व हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे समन्वयक पदी पत्र देऊन नियुक्त्या जाहीर केल्या. यावेळेस जिल्हाप्रमुख अनिल देवतारे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दिलीप भुजाडे, वर्धा तालुका प्रमुख गणेश इखार यांची उपस्थिती होती.