प्रेमीयुगलाने घेतला उपविभागीय पोलीस अधिकारी व ठाणेदार यांच्या साक्षीने लग्नाचा निर्णय

 

जिल्हा प्रतिनिधी //उमंग शुक्ला

आर्वी ; स्थानिक आर्वी येथे आज दिनांक 14/02/2022 रोजी नेरपिंगळाई येथील अर्चना ज्ञानेश्वर हिवराळे वय 23 ही आर्वी पोलीस स्टेशनं ला तिला देवकिसन श्रीकृष्ण सातपुते यांनी लग्नाच आमिष देत आठ महिन्या पूर्वी नेरपिंगळाई वरून आर्वी येथे आणून नवरा बायको सारखे राहू लागले अर्चना ज्ञानेश्वर हिवराळे, ही सतत तिला रीतसर नोंदणी करून लग्न करायचे आहे असा तगादा लावत होती या दरम्यान दोघात वादाची ठिणगी पडली आणि आठ दिवसा अगोदर देवकिसन अर्चना हिला रूम वर सोडून निघून गेला अर्चना हिने दरम्यान राष्ट्रवादी चे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पोटफोडे यांची भेट घेतली असता ठाणेदार भानुदास पिदूरकर यांच्या कानावर सर्व बाब टाकली असता ठाणेदार भानुदास पिदूरकर यांनी डी वाय एस पी साळुंखे साहेबाना प्रकरणाचा गांभीर्य सांगितलं असता आर्वी पोलीस स्टेशनं मधून तपासाची चक्रे फिरली अवघ्या काही तासात देवकिसन पोलीस स्टेशनं ला हजर केला गेला या वेळी दोघांनी लग्नाची सहमती दर्शविल्या मुळे ठाणेदार पिदूरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी साळूंखे साहेब यांच्या साक्षीने पोलीस स्टेशनं ला एकमेकांच्या गळ्यात हार टाकलेत या वेळी सर्व लग्नासाठी शासकीय प्रशासकीय व इतर सहकार्य करण्याची जबाबदारी ऍड दीपक मोटवानी यांनी या गरीब युगलांना दिली यावेळी मुलीकडून आई वडील मोठी आई व मुलाकडून मोठा भाऊ किसना सातपुते हजर होता या शुभ क्षणी सर्वाना पेढे भरवून आई वडिलांनी आनंद व्यक्त केला तसेच उद्या वर्धा कोर्ट ला नोंदणी विवाह पद्धतीने नोंदणी करणार असल्याचे आप्त स्वकीयाने सांगितले या वेळी पोलीस विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी दोन्हीही पक्षाला सहानुभूती पूर्वक मदत केल्याच निदर्शनास आलं