वाघाच्या हल्ल्यात तरुण ठार घटनास्थळी नागरिकांची गर्दी ; वनविभागावर महिलांनी रोष केला व्यक्त

 

कारंजा (घा.) तालुक्यातील कन्नमवार ग्राम शिवारात आज सकाळच्या सुमारास तरुणाला वाघाने ठार केले. शेतातून तरुण परत न आल्याने ही घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे. वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या तरुणाचे नाव लक्ष्मण महादेव हूके अस नाव आहे.
मृतक लक्ष्मण हूके हा ठेक्याने केलेल्या शेतातील गव्हाच्या पिकात हिरवा चारा काढत असताना अचानक वाघाने हल्ला केला त्याने वाघाने काही अंतरावर फरफटत नेण्यात आल्याचे दिसून येत आहे. लक्ष्मण हूके हे सकाळपासून शेतात गेले असता घरी परत न आल्याने घराशेजारील मुलाला पत्नीने शेतात पाठवले. शेतात पाहणी करायला गेलेल्या युवकाला वाघाचे दर्शन झाले यात मुलाने धूम ठोकत घराकडे पळत सुटला आणि लोकांना बोलावून आले. त्यानंतर वाघाला नागरिकांनी हुलकावून लावले. यात लक्ष्मण हूके यांचा मृतदेह आढळून आले. वाघाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती गावात पसरताच गावकऱ्यांनी बघायला गर्दी केली.घटनास्थळी वनविभाग आणि पोलीस दाखल होताच नागरिकांनी रोष व्यक्त करत मृतदेह उचलण्यास मनाई करण्यात आली. जोपर्यंत मृतकाच्या पत्नीला नौकरी लावण्याचे आश्वासन देत नाही तोपर्यंत मृतदेह शवविच्छेदनला नेण्यात येऊ नये अशी बतावणी केली. त्यानंतर वनविभाग आश्वासन देण्यात आले त्यानंतर मृतदेहाला शवविच्छेदन साठी हलविण्यात आले.

 

 

दोन ट्रॅप कॅमेऱ्यात लावले
आज झालेल्या हल्ल्यात वाघ की वाघिण हे अजूनही कळू शकले नाही यासाठी परिसरात दोन ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहे. रात्रीला ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर वाघ की वाघीण कळणार आहे.

 

पथकाची होणार नेमणूक तर पत्नीला रोजमजुरीवर घेणार
लक्ष्मण हूके हे वाघाच्या हल्ल्यात ठार झाले असून त्यांच्या कुटुंबियांना 5 लाखाची मदत देणार आहोत आणि पत्नीला रोजमजुरी कामावर घेतले जाणार आहे.त्यात वाघाचे हल्ले होऊ नये यासाठी परिसरातील गावातील पाच लोकांची पथक नेमणूक करणार आहे त्यात एक वनरक्षक राहणार असून ते परिसरात भ्रमंती करत राहणार असे काही राहिल्यास तातडीने नागरिकांना याबाबत माहिती दिली जाणार आहे. यामुळे वाघाचे हल्ले नक्कीच कमी होणार.
गजानन बोबडे
सहाय्यक वनसंरक्षक वर्धा