प्रहारचे लक्षवेधी श्रद्धांजली आंदोलन

 

आर्वी ते तळेगाव रोडनी
येणाऱ्या-जाणाऱ्या त्रस्त नागरिकांनी निष्क्रिय लोकप्रतिनिधींना वाहली श्रद्धांजली

आर्वी :- आर्वी ते तळेगाव रोडनी
येणाऱ्या-जाणाऱ्या त्रस्त नागरिकांनी निष्क्रिय लोकप्रतिनिधींना वाहली श्रद्धांजली
आर्वी ते तळेगाव या महामार्गाचे काम बंद असलेले काम लवकरात लवकर चालू होऊन पूर्णत्वास जावे याकरिता प्रहार ने हा पूर्ण सप्ताह आंदोलन सप्ताह म्हणून घोषित केला होता. त्याचप्रमाणे पहिला टप्पा उपविभागीय कार्यालयासमोर मुख्य रस्त्यावर रास्तारोको आंदोलन केले होते. त्या आंदोलनानंतर आर्वीचे तहसीलदार यांनी पत्राद्वारे आंदोलनाचे नेते बाळा जगताप यांना बैठकीसाठी पाचारण केले. सादर बैठकीला तहसीलदारांनी मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग (NH) नागपूर यांना सुद्धा हजर राहण्याचे कळविले. मात्र बाळा जगताप व प्रहार ने आता पुन्हा बैठका व आश्वासने नको काम हवे अशी भूमिका घेत बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. कारण या आधी सुद्धा संबंधित सर्व यंत्रणेशी वारंवार बैठका झाल्या आश्वासने मिळाले. काम पूर्ण करण्याच्या तारखा सुद्धा सांगितल्या मात्र त्या सर्व हवेत विरल्या. ज्या बैठकीतून आश्वासनांशिवाय काही मिळणार नाही. आणि मिळालेले आश्वासन कधी पाळले जाणार नाही. अशा बैठकीवर बहिष्कार घालणेच उत्तम राहील अशी भूमिका बाळा जगताप यांनी घेतली होती व आहे. असे लागोपाठ आंदोलनातून दिसून येत आहे. आता बैठका आणि आश्वासने नको, तर जमिनी स्तरावर काम हवे अशी भूमिका बाळा जगताप यांनी व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया

■ निष्क्रिय शासनाच्या हलगर्जीपणामुळे आर्वी तळेगाव रोडचे काम गेल्या तीन वर्षापासून सुस्त व मंद गतीने सुरू आहे. परंतु रोडचे काम अजूनही पूर्णत्वास आले नाही. याला जबाबदार फक्त निष्क्रिय शासन व लोकप्रतिनिधी आहे. सारखे आंदोलन सप्ताह सुरू असून शासन व लोकप्रतिनिधींना जाग येत नाही लागोपाठ आंदोलन होऊनसुद्धा अशा अडेलतट्टू धोरणामुळे शासन व प्रतिनिधी किती निष्क्रिय आहे असे स्पष्ट दिसून येत आहे. जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन सामना करावा लागत आहे. तरीही
मोठ मोठ्या नेत्यांची फक्त आश्वासने व मीटिंगच होत आहे. आता खूप झाले मीटिंग व आश्वासने, आता मीटिंग नव्हे तर काम सुरु करा.
निष्क्रिय शासन व लोकप्रतिनिधींना श्रद्धांजली वाहून सुद्धा जाग येत नसेल तर पुढचे आंदोलन यापेक्षाही उग्र राहील असे प्रहारचे बाळा जगताप यांनी सांगितले