वेकोली महाप्रबंधक कार्यालयातील नियोजन अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून युवतीची आत्महत्या युवतीला कार्यालयात बोलाऊन परिवारासमोर केले होते अपमानित मुलीचा मृतदेह घेऊन वेकोली महाप्रबंधक कार्यालयासमोर मृतकच्या परिवाराचे आंदोलन नियोजन अधिकाऱ्यावर कार्यवाही करून निलंबित करण्याची कुटुंबीयांची मागणी

वेकोली महाप्रबंधक कार्यालयातील नियोजन अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून युवतीची आत्महत्या

 

युवतीला कार्यालयात बोलाऊन परिवारासमोर केले होते अपमानित

 

मुलीचा मृतदेह घेऊन वेकोली महाप्रबंधक कार्यालयासमोर मृतकच्या परिवाराचे आंदोलन

नियोजन अधिकाऱ्यावर कार्यवाही करून निलंबित करण्याची कुटुंबीयांची मागणी

 

बल्लारपूर (राजू वानखेडे : तालुका प्रतिनिधि)

 

वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्रातील महाप्रबंधक कार्यालयातील नियोजन अधिकाऱ्याच्या वागणुकीने स्थानिक प्रकल्पग्रस्त चांगलेच त्रस्त दिसत आहे. त्यांना अनावश्यक कागदपत्र मागणे, त्याची पूर्तता न केल्यास पैशाची मागणी करणे ,अरेरावी ने बोलणे, दलालांना जवळ करून प्रकल्पात जमिनी गेलेल्यांना ऑफिसातून अपमानित करीत बाहेर काढणे असे प्रकार राजरोसपणे सुरु असल्याने या नियोजन अधीकार्याची येथून हकालपट्टी करण्याची मागणी काही दिवसांपूर्वी केली असल्याचे प्रकरण ताजे असतांनाच याच अधिकार्यांच्या वागणुकीमुळे त्रस्त झालेल्या आशा तुळशीराम घटे वय १९ राहणार साखरी-सास्ती या मुलीने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार आशाचे वडील व तिच्या आजोबांच्या नावाने असलेली शेती वेकोलीच्या धोपटाळा प्रोजेक्ट मधे अधिग्रहीत करण्यात आली आहे. या प्रकरनी महाप्रबंधक कार्यालयातील नियोजन अधिकारी याने दिनांक 22 मार्च 2021 ला आपल्या कार्यालयात बोलावून आशा सह तिच्या परिवारातील आई, वडील, मोठे वडील, काका यांना पाचारण केले. यावेळी तिचे वडील व आजोबा यांनी संमतीपत्राद्वारे आपल्या मुलीला नौकरी देण्याचे करारनामा दिला होता. परंतु या नियोजन अधीकार्याने आशा ला तिच्या संपूर्ण परिवारा समोर अपमानित करत अपशब्द वापरले असे तिच्या वडिलांसह कुटुंबातील नातेवाहिकांचे म्हणणे आहे. त्यानंतर तिने घरी येऊन विष प्राशन केले. परंतु आशा ने वीष प्राशन केले याबाबत घरच्याना काहीही माहिती नव्हते. दुसऱ्या दिवशी अचाणकपणे आशा ची प्रकुती खराब झाल्याने त्यांनी सास्ती येथील खाजगी रूग्णालयात औषधोपचार केले. आणखी प्रक्रुती बिघडत गेल्याने दिनांक 27 मार्च ला चंद्रपुर येथील खाजगी रूग्णालयात भरती केले. दरम्यान परिस्थिती हाताबाहेर जात असल्यामुळे आज 31मार्च ला जिल्हा सामान्य रूग्णालयात पुढील उपचारांसाठी आणले असता सकाळी दहा वाजता च्या दरम्यान आशा ची प्रानज्योत मालवली. चंद्रपुर येथून म्रूतदेह घेऊन ते राजुरा पोलीस स्टेशनला तक्रार देण्याकरता आले असता त्यांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याने शेवटी त्रासून परिवारातील नातेवाहीकानी आशा चा म्रूतदेह वेकोली महाप्रबंधक कार्यालया समोर आणल्याणे परिस्थिती चिघडली. तात्काळ राजुरा पोलीस वेकोली कार्यालयाच्या प्रवेश दारावर पोहचले व दंगा नियंत्रण पथकाला पाचारण केले. आज बुधवार असल्याने वेकोली कार्यालयात शुकशुकाट बघायला मिळाला. परंतु आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असतांना कार्यालय शांत असल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. दरम्यान मृतकाच्या नातेवाहिकांनि नियोजन अधीकार्यावर गंभीर आरोप करीत त्याचे तात्काळ निलंबन करा अशी मागणी करत योग्य कार्यवाही न झाल्यास आम्ही आंदोलन करू असा गंभीर इशारा दिला. बातमी लीहेस्तोवर पोलीस स्टेशनला तक्रार केलेली नाही व नियोजन अधिकार्यांवर कुठलीही कार्यवाही झालेली नाही. आशा च्या म्रूतू पश्चात आई ,वडील व एक भाऊ आणि बहीण आहे. वेकोलीच्या नियोजन अधिकार्यांशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क केला असता त्यांनी कॉल उचलला नाही.

वेकोलीच्या असंख्य कोळसा खाणीत शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. नवनवीन खाणीत जमिनी जात असल्यामुळे शेतकरी आपल्या कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी या नियोजन अधिकार्यांकडे येतात. मात्र त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करण्यापेक्षा त्यांना हाकलून लावण्याचा सपाटा सुरू केला आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी सास्ती येथील प्रकाश व विलास भटारकर हे आपल्या कामासाठी गेले असता जोर जोराने बोलत त्यांना ऑफिस च्या बाहेर काढले. असे एक नाही तर अनेक प्रकार येथे सुरू आहे येथे येणाऱ्यासोबत त्याची अशीच वागणूक असून दलालांना मात्र अगदी जवळ घेऊन गुप्तगु करत विनाकारण बऱ्याचवेळ पर्यंत बसून गप्पा मारत असतो.

गावातील गोरगरीब ,अशिक्षित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या अद्याणाचा फायदा घेऊन अशी ही त्याची वागणूक बरी नसून या नियोजन अधिकाऱ्याच्या विरोधात परिसरातील शेतकरी अधिकच संतप्त दिसू लागले आहे. अश्या या अधिकाऱ्याची तात्काळ उचलबांगडी करावी तसेच योग्य चौकशी करून त्याला निलंबित करावे, कायदेशीर कायदेशीर कार्यवाही करावी अन्यथा आदोलन करू असा इशारा म्रूतक आशा च्या वडिलांसह तिच्या परीवारीतील नातेवाहीक तसेच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे.