संपादक // अनिकेत खरवडे
स्थानिक अहेरी येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालय येथे आज बुधवार दिनांक ३१ मार्च २०२१ रोजी (तिथीनुसार) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त शिवसेना कार्यालय अहेरी येथे सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दिप प्रज्वलन करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.व अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णाना फळ व भिस्कीटचे वाटप करण्यात आले.राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता निवडक शिवसैनिकानी सामाजीक सुरक्षीत अंतर राखून प्रत्येकाने तोंडाला मास्क लावून कार्यक्रमास उपस्थीत होते.या वेळी छञपती शिवाजी महाराजांच्या जिवन चरीञावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख राजगोपाल सुलवावार, उपजिल्हा प्रमुख रियाज भाई शेख, अहेरी विधानसभा प्रमुख अरुण धुर्वे, तालुका प्रमुख अक्षय करपे, ग्रामीण तालुका प्रमुख सुभाष घुटे, महिला आगडी तालुका प्रमुख तुळजा तलांडे, महिला आघाडी उप तालुका प्रमुख संपणा ईश्वरकर, उपतालुका प्रमुख प्रफुल येरने, विभाग प्रमुख अनिकेत खरवडे, आल्लापल्ली शहर प्रमुख सज्जू शेख, व शिवसैनिक उपस्थित होते.