चंद्रपूरकर सावधान लवकरच आपल्यावर मनपा द्वारा लादण्यात येणार आहे “शौचालय सेप्टिक टैंक स्वछता” नावाचा नवीन कर.. ऍड. राजेश विराणी, मा. शहर संयोजक “आप”

 

बल्लारपूर (राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

चंद्रपूरची जनता २०१६ मध्ये वाढविलेल्या भरमसाठ मालमत्ताकर, पाणी कर, स्वछता कर, विज बिल या मुळे त्रस्त झालेली आहे आणि परत त्यामध्ये शौचालयाची सेप्टिक टैंक स्वछते साठी शुल्क एक ते तीन हजार रुपये मालमत्ताकरात घरामध्ये लावलेल्या एक हजार लिटर ते ३००० लिटरची સેપ્ટિક टैंक प्रमाणे मनपा या वर्षी मालमत्ताकरामध्ये समाविष्ट करणार आहे. अगोदरच कोरोनामुळे लोकांचे आर्थिक कंबरडे मोडले असताना हा नवीन कर मनपा जनतेच्या माथी मारणार असल्यामुळे जनतेला पुन्हा आर्थिक भुदंड सहन करावा लागणार आहे. राज्यात मुंबईनंतर सर्वाधिक मालमत्ताकर चंद्रपूर शहरामध्ये आहे. नागपूर हे चंद्रपूर पेक्षा कितीतरी लोकसंख्येने मोठे असून सुद्धा तिथे मालमता कर चंद्रपूर शहरापेक्षा फारच कमी आहे. आज शहरात टाकण्यात आलेली मल निस्सारण गटर योजनाचे सुद्धा मनपाद्वारे बारा वाजविण्यात आलेले आहे जनतेचे कराचे करोडो रुपये या योजनेमध्ये बरबाद झालेले आहे तरी सुद्धा मनपा प्रशासन मुंग गिळून बसलेली आहे.

 

सध्या संपूर्ण विश्वामध्ये मागील वर्षापासून करोनाचा वायरस धुमाकूळ करीत आहे त्याचा प्रकोपा मध्ये आपला देश आणि चंद्रपूर शहर ही समाविष्ट आहे यामुळे पुष्कळ लोकांचे घर ही त्यांचा कुटुंबियाच्या निधनामुळे उद्वस्त झालेले आहे आणि त्यातच आपल्या कार्यालयाकडून वरील नवीन कराचा समाविष्ट मुळे शहरातील ८७ हजार ७४९ मालमत्ताधारकावर याचा गंभीर परिणाम पडणार आहे. परंतु चंद्रपूर शहर आम आदमी पार्टी, चंद्रपूरच्या मालमत्ताधारकावर याचा परिणाम पडू देणार नाही. यासाठी वेळ पडले तर मनपा प्रशाशाना विरुद्ध आंदोलन सुद्धा उभारण्यात येईल., करिता आम आदमी पार्टी चंद्रपूर शहरची मागणी आहे की, आपण ३१ मार्च २०२१ ला होणार्या महानगरपालिकेची ऑनलाईन आमसभेमध्ये या विषयाला मंजुरी देण्यापूर्वी आमच्या पक्षाकडून कर रद्द करण्याची मागणी जे जनतेच्या हिताकरिता आहे ते समोर ठेवून त्याला रद्द करण्यात यावे.

आता तरी चंद्रपूरची जनतेला जागृत होणे आवश्यक आहे. नाही तर भविष्यात चंद्रपूर महानगरपालिकाचे प्रशासन तुमचे राहते घर विकण्यास ही मागे पुढे पाहणार नाही. आणि त्यासाठी संपूर्ण जवाबदार तुम्ही स्वतः राहणार आहे.

आम आदमी पार्टी नेहमी जनतेला होणार्या अन्यायाला वाचा फोडत असते आणि या कराबद्दल ३० मार्च २०२१ रोजी मा. आयुक्त यांना पक्ष तर्फे जाब विचारणार आहे.