प्रतिनिधी // शुभम खरवडे
तुळशी दि.२७
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत कडधान्य करडी पीक प्रात्यक्षिक व शेती दिन कार्यक्रम नुकताच देसाईगंज तालुक्यातील वडसा (नैनपूर ) येथे घेण्यात आला. नैनपूर येथिल शेतकरी शंकर भाजीपाले ,वडसा येथिल शेतकरी मोतीलाल कुकरेजा या दोन्ही शेतकऱ्यांच्या शेतावर करडी प्रात्यक्षिक घेण्यात आले तर मोतीलाल कुकरेजा यांच्या शेतावर शेती दिन कार्यक्रम घेण्यात आला.
करडी हे रबी हंगामातील कमी खर्चीक व महत्वाचे तेलबिया पीक आहे.अवर्षणावर मात करण्याची क्षमता या पीकामध्ये जास्त असल्याने इतर रबी पीकांपेक्षा कोरडवाहू शेताकरीता हे पीक शेतकऱ्यांना वरदान ठरणारे आहे. त्यामुळे करडी पिकाच्या उत्पादनाकडे शेतकऱ्यांनी वळण्याची गरज आहे ,असे मत यावेळी बोलतांना मान्यवरांनी व्यक्त केले.
प्रायोगिक तत्वार करडी पिकाचे वाण ए. के. एस -२०७ पिकाचे प्रायोगिक तत्वावर प्रात्यक्षिक घेणारे वडसा मुख्यालयात शेतकरी शंकर चेंडूजी भाजीपाले नैनपूर, मोतीलाल गोंगुमल कुकरेजा वडसा यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेट देऊन पिक प्रात्यक्षिक शेतीदिन कार्यक्रम घेण्यात आला.याचा लाभ बहुसंख्य शेतकऱ्यांना मिळाला.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून तालुका कृषी अधिकारी निलेश गेडाम , मंडळ कृषि अधिकारी रुपेश मेश्राम , कृषी पर्यवेक्षक ताडपल्लीवार उपस्थित होते.सदर कार्यक्रमाला महिला शेतकऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी , पीक प्रात्यक्षिक व मार्गदर्शनासाठी कृषी सहाय्यक कु. कल्पना ठाकरे यांनी विशेष प्रयत्न केले.