भीषण अपघात 4 मृत्यू तर 15 जखमी आष्टी-आलापल्ली मार्गावर चौडमपल्ली गावाजवळ घटना

 

 

 

 

     संपादक // अनिकेत खरवडे

 

गडचिरोली: होळीचा सण अनेक नागरिकांच्या जीवनात दुर्दैव घेऊन आला की काय असा प्रश्न निर्माण झाला चंद्रपूर घुग्गुस मार्गावर ट्रकच्या मागील चाकात येऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पिक-अप वैन व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ च्या एसटी बस च्या भीषण अपघातात 4 व्यक्तीचा मृत्यू तर 15 व्यक्ती गँभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे आज दुपारी 2:00 वाजताच्या सुमारास तेलंगाणा वरून गडचिरोली येथे मिर्ची तोडण्याकरिता मजूर घेऊन येणारी पीक अप वैन व आष्टी वरून आलापल्ली येथे जाणारी एसटी बस यांचा चौडमपल्ली गावाजवळ भीषण अपघात झाला या अपघातात पिक अप वाहनाचा चालक व एक व्यक्ती घटनास्थळीच मृत्यू झाला तर गडचिरोली येथे उपचारासाठी नेत असतांना 2 व्यक्तींचा मृत्यू झाला असे एकूण 4 व्यक्तीचा मृत्यू झाला तर 15 व्यक्ती जखमी असल्याची माहिती त्यापैकी 3 व्यक्ती गंभीर जखमी असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आल्याचे वृत्त आहे. या भीषण अपघातामुळे घटनास्थळी अतिशय विदारक चित्र होते अपघाताची माहिती कळताच आष्टी पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी लगेच जखमींना रुग्णालयात पोहोचविण्याची व्यवस्था केली तसेच या अपघाताचा पुढील तपास आष्टी पोलीस करीत आहे.