आज क्रांतिवीर पैलवान नागनाथ अण्णा नायकवडी यांची पुण्यतिथी

 

सांगली जिल्ह्यातील वाळवा गावचे सुपूत्र ज्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध शड्डू ठोकले आणि ज्या सत्तेवरुन सूर्य मावळत नाही अश्या जुलमी सत्तेला महाराष्ट्रातून सळो की पळो करून सोडले.1940 च्या दशकात क्रांतीअग्रणी जी.डी.बापू लाड आणि क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांना क्रांतिसिंह नाना पाटलांचे संताजी धनाजी अशीच बिरुदावली होती.धुळे खजिना लूट असो किंवा शेणोली पे ट्रेन ची लूट या जोड गोळीने आपल्या पराक्रमाने कृष्णाकाठ हादरुन सोडला होता.स्वातंत्र्यानंतर सुद्धा उपेक्षितांच्या बाजूने आणि कामगार चळवळीत ते सक्रिय राहिले.सांगाव जि.सांगली गावातील ब्रिटिश पोलीस ठाण्यातील बंदुका पळवून त्यांनी वाळव्यातून मिरवणूक काढली.सलग 2 वेळा विधानसभेवर निवडून गेले होते.एक फार मजेशीर किस्सा होता की त्याना दुसऱ्या वेळी निवडणुकीला सिंह हे चिन्ह मिळाले होते.अण्णांचे कार्यकर्ते एवढे निष्णात होते की त्यांना खरोखर चा सिंह प्रचाराला आणला होता.मी खूप भाग्यवान आहे की मी जी. डी. बापू आणि नागनाथ अण्णांच्या परिसराने पावन झालेल्या भूमीत लहानाचा मोठा झालो.अण्णांच्या पवित्र स्मृतीस कुस्ती मल्लविद्या महासंघाची भावपूर्ण श्रद्धांजली.