बल्लारपूर ( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)
शासनाच्या धोरणाविरूध्द केलेली चुक दुरूस्त करा अन्यथा आंदोलन तीव्र करू असा इशारा दिला.
140.70 कोटी मोबदला शेतकऱ्यांना द्या, अन्यथा कोळसा उत्खनन परवानगी 31 मार्च पर्यत रद्द करा , प्रकल्पग्रस्त शेतकरी व कामगारांचा प्रलंबित मोबदला व थकीत वेतनाचा प्रश्न बरांज या गावाचे पुनर्वसन आदी प्रश्न मार्गी न लावताच केपीसीएलच्या बरांज कोळसा खाणीस उत्खननाची परवानगी देण्याची प्रशासनाची कृती अन्यायी तसेच प्रकल्पग्रस्तांच्या भावनांना चिरडणारी असल्याने या दुर्भाग्यपूर्ण निर्णयाला विरोध दर्शवित केपीसीएलला दिलेली उत्खननाची परवानगी त्वरीत रद्द करावी या भावनेतून 30 कि.मी. अंतरावरून पैदल मार्च करीत प्रकल्पग्रस्त बांधव व कामगारांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्याची भुमिका स्विकारली. जिल्हा प्रशासनाने नैतिकता दाखवित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना 140 कोटी 70 लाख रूपयांचा मोबदला त्वरीत मिळवून द्यावा अन्यथा उत्खननास दिलेली परवानगी 31 मार्च पर्यंत रद्द करून प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या भावनांचा सन्मान करावा अशी मागणी करीत विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.