बल्लारपुर शहरातील वस्तिविभागातील प्राथमिक नागरिक आरोग्य केंद्रात लसिकरण केंद्राचे नगराध्यक्ष मा.हरीश शर्मा यांच्या हस्ते लोकार्पण

 

 

बल्लारपूर( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

माझे कार्यक्षेत्र माझी जबाबदारी

या कार्यक्रमा अंतर्गत जिल्हाधिकारी मा.अजय गुल्हाने सर यांच्या पुढाकाराने बल्लारपुर येथे झालेल्या बैठकीत शहराचे नगराध्यक्ष हरीश शर्मा यांनी शहरात कोविन लस देण्याचे वाॅक्सीनेशन केंद्र वाढविण्या संदर्भात विनंती केली होती त्या अनुशंगाने वस्तीविभागातील प्राथमिक नागरिक आरोग्य केंद्रात आज लसिकरण केंद्राचे बल्लारपुर शहराचे प्रथम नागरिक मा.हरीशजी शर्मा यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.यामुळे नागरिकांची लसिकरण केंद्रावर होणारी गर्दी विभागली जाईल व नागरिकांना होणारा त्रास कमी होईल.यावेळी प्रामुख्याने बल्लारपुरचे तहसिलदार मान.राईंचवार साहेब,न.प.चे मुख्याधिकारी मा.विजय सरनाईक सर,उपाध्यक्ष सौ.मिनाताई चौधरी,सभापती येलया दासरफ,सभापती सौ.सारीका कनकम,ग्रामिण रूग्णालयाचे डाॅ.मेश्राम सर,डाॅ.अतुल कोहपरे सर,डाॅ.डांगे मॅडम,डाॅ.शेगावकर मॅडम व भाजपाचे श्री.गणेश चौधरी तसेच रुग्णालयाचे परिचारीका उपस्थित होते