जिल्हा परिषद अध्यक्षांच्या हस्ते येलचिल जि.प.शाळेतील नवीन वर्ग खोलीचे उदघाटन

 

अहेरी तालुका प्रतिनिधी इरफान शेख

 

अहेरी : जिल्हा परिषद गडचिरोली, पंचायत समिती अहेरी, ग्राम पंचायत कार्यालय वेलगुर अंतर्गत येलचिल येथे जिल्हा परिषद शाळा असून इयत्ता १ ली ते ७ वी पर्यत शिक्षण असून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र या शाळेत वर्गखोलीची कमतरता असल्याने विद्यार्थ्याना शिक्षण घेण्यासाठी अडचण निर्माण होत होती. जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे वर्ग खोली बांधकामाबाबत मागणी केली असता जि.प.अध्यक्ष यांनी सन २०१९-२० जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून नविन वर्ग खोली उपलब्ध करून दिली. सदर नवीन वर्ग खोलीचे बांधकाम पूर्ण पणे झाले असून काल जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

सदर उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे होते तर विशेष अतिथि म्हणून प.स.उपसभापती सौ.गीताताई चालुरकर, वेलगुरचे सरपंच किशोर आत्राम, उपसरपंच उमेश मौहूर्ले, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मुश्ताक हकीम ,वेलगुरचे ग्राम सेवक बंडावारजी, रेखा आञाम ग्रा.प.सदस्य वेलगुर, बेबी पाटाळी ग्रा.प.सदस्य वेलगुर, येलचिल पोलिस पाटील तलांडी, प्रशांत गोडसेलवार, प्रकाश दुर्गे, पुनेश कंदीकुरवार, राजु, राकेश, गिरमा व शिक्षक वृंद व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.