भाजपात बूथ प्रभारी व शक्तिकेंद्र प्रमुख यांना महत्वाचे स्थान-डॉ.मंगेश गुलवाडे  पूर्व (बंगाली कॅम्प) मंडळात बूथ प्रभारी व शक्तिकेंद्र प्रमुखांची बैठक संपन्न

 

बल्लारपूर ( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

 

महानगर जिल्हा भाजपा तर्फे बूथ रचना सक्षम करण्याचे कार्य सुरू आहे.या निमित्ताने पूर्व (बंगाली कॅम्प)मंडळात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले. भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे म्हणाले, भाजपात बूथ प्रभारी व शक्तीकेंद्र प्रमुख यांना महत्वाचे स्थान असून कार्यशैलीच्या जोरावरच बूथ रचना मजबूत होऊ शकते. भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर बूथ संयोजक तथा महामंत्री ब्रिजभूषण पाझारे यांनी बूथ प्रभारी व शक्तीकेंद्र प्रमुख यांनी बूथ रचनेचा पुढील टप्पा लवकरात-लवकर पूर्ण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या. बैठकीला भाजपा महामंत्री सुभाष कासनगोट्टूवार,महामंत्री रवींद्र गुरनुले,महिला व बालकल्याण सभापती चंद्रकलाताई सोयाम,झोन सभापती अंकुश सावसाकडे,मंडळ अध्यक्ष दिनकर सोमलकर,नगरसेविका जयश्रीताई जुमडे, वंदनाताई जांभुळकर,अनु:जाती मोर्चा अध्यक्ष धम्मप्रकाश भस्मे,अनु:जमाती मोर्चा अध्यक्ष धनराज कोवे,ओबीसी मोर्चा महानगर महामंत्री शशिकांत मस्के,मंडळ महामंत्री मनोरंजन मनोज पोटाराजे आशिष ताजने गिरीधर येडे,रामजी हरणे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.