जिल्हा कुस्ती मल्लविद्या महासंघातर्फे पंच प्रशिक्षण उत्तीर्ण पंचांचा सन्मान

  पै.परशुराम बंगे मित्रपरिवार आयोजित सन्मान सोहळ्यास कुस्ती मल्लविद्या पदाधिकाऱ्यांचा उदंड प्रतिसाद

 

आळवे ता.पन्हाळा जि.कोल्हापूर येथे कुस्ती मल्लविद्या महासंघ पन्हाळा तालुका पदाधिकारी पै.परशुराम बंगे आयोजित कोल्हापूर जिल्हा पंच प्रशिक्षण उत्तीर्ण झालेल्या पंचांचा नागरी सन्मान काल रविवार दिनांक 21 मार्च 2021 रोजी आयोजित करण्यात आला होता.सदर कार्यक्रमास 1965 चे टोकियो ओलिम्पिकपट्टू पै.बंडा मामा रेठरेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.यासह कुस्ती मल्लविद्या महासंघाचे संस्थापक पै.गणेश मानुगडे, उपाध्यक्ष पै.राहुल जाधव सर,कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष आनंदराव पाटील सर,कार्याध्यक्ष पै.नारायणराव गाडगीळ, वस्ताद जयवंतराव पाटील,पै.सचिनराव राठोड,पै.गजानन माने,पै.विक्रमसिंह माने,महिला अध्यक्ष अनिता पाटील,सचिव संगीता पाडेकर यासह कुस्ती मल्लविद्या महासंघ कोल्हापूर जिल्हा व तालुका कार्यकारणी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे प्रवक्ते पै.दत्तात्रय ठाणेकर यांनी केले.सदर कार्यक्रमाचे सुंदर व नीटनेटके आयोजन पै.परशुराम बंगे मित्रपरिवार यांनी केले.