भाजपा महाराष्ट्र प्रदेश द्वारा  आघाड़ी सरकारचा निषेध  

 

बल्लारपूर( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी :मुंबई पोलीस विभागाला १०० कोटी रु जमा करून देण्याचे टार्गेट दिले होते अशा भ्रष्ट गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्यात येत आहे.

भारतीय जनता पार्टी वरोरा विधानसभा द्वारा पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज जी अहीर यांच्या नेतृत्वात आज आंबेडकर चौक वरोरा येथे गोरगरीब जनतेचे पैसे अशा अमानवीयतेणे लुटणाऱ्या भ्रष्ट सरकारचा निषेध केला व राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भगवान गायकवाड, ज्येष्ठ नेते बाबाभाऊ भागडे, वरोऱ्याचे नगराध्यक्ष एहेतेशाम अली, श्री ओम मांडवकर, वरोरा शहर अध्यक्ष सुरेश महाजन व भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.